भोंग्यापेक्षा महागाईवर बोला; संजय राऊतांचा मनसे- भाजपवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महागाईच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकार वर जोरदार निशाणा साधला आहे. देशातील जनता महागाईशी लढत आहे. त्यामुळे भोंग्याचा विषय संपला आहे. असे राऊतांनी म्हंटल. त्यामुळे भोंग्याचं सोडा, आता महागाईवर बोला असं आव्हान संजय राऊत यांनी दिले. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते

सरकार म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, महागाई यावर बोलणं सरकारचं कर्तव्य आहे. भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही, पण भाजपचा एकही नेता महागाईवर बोलत नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची चिंता आहे. त्यासाठी ते मध्यस्थी करत आहेत. पण देशातील जनतेची त्यांना काळजी नाही असं संजय राऊत ,म्हणाले

भोंग्याबाबत केंद्र सरकारने धोरण ठरवावे असं आम्ही आधीच सांगितले आहे. महाराष्ट्रात काही लोक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत होते. भोंग्यावरून हिंदू -मुस्लीम यांच्यात तणाव निर्माण करण्याचा, दंगे करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, महाराष्ट्रातील सर्व जाती, धर्माच्या लोकांनी त्यांना खणखणीत उत्तर दिलं असं म्हणत त्यांनी मनसेवर देखील निशाणा साधला

Leave a Comment