असे तयार होतात एक चविष्ट ‘संजय राऊत’; किरण मानेंची पोस्ट चर्चेत

0
82
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. किरण माने आपल्या बेधड वृत्तीसाठी ओळखले जातात. ते सातत्याने समाजात घडणाऱ्या विविध गोष्टींबाबत आपलं मत बिनधास्त पणे सोशल मीडियावर मांडत असतात. आताही त्यांनी अशीच एक राजकीय पोस्ट शेअर करत त्यात नेत्यांची नावेही टाकली आहे. किरण माने यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये किरण माने म्हणतात, साधारणपणे सव्वापाच वाट्या किरीट सोमैय्या, साडेतीन टेबलस्पून चंद्रकांतदादा, अर्धा चमचा उपाध्ये किंवा वाघताई – दोघांपैकी जे हाताशी असेल ते… वरून चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे.. याचं मिश्रण एकजीव करून खरपूस तळलं की एक चविष्ट ‘संजय राऊत’ तयार होतात!!

किरण माने यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी एकापेक्षा एक जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत.काही जणांनी कंमेंट्स करत ओके आहे मिश्रण अस म्हंटल आहे. तर एका व्यक्तीने पडळकर कडीपत्ता तरी टाकायचा अस म्हंटल आहे. तर एकाने तर तीन पाकळ्या नारायण राणेंना नाही टाकलं म्हणून जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here