हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने प्रसिद्ध वकील उज्वल निकम (Ujjwal NikA) याना उमेदवारी जाहीर केली आहे. उज्ज्वल निकम यांच्या राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चा मागील अनेक वर्षांपासून सुरु होत्या. अखेर त्यांनी भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरून राजकारणात प्रवेश केला. उज्जवल निकम यांच्या समोर महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड यांचे आव्हान असेल. तत्पूर्वी ठाकरे गटाचे नेते आणि प्रसिद्ध अभिनेता किरण माने यांनी उज्वल निकम यांच्यावर निशाणा साधला आहे. किरण राणे यांनी उज्ज्वल निकम यांचा उल्लेख भामटा असा केला आहे.
किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हंटल की, महाराष्ट्रातल्या दोन पक्षांवर दरोडे पडले तेव्हा न्यूज चॅनल्स याच विद्वान वकिलाकडून एक्सपर्ट ओपिनियन घेत होते. हा भामटा पटवून देत होता की हे दरोडे कसे कायदेशीर आहेत. आत्ता समोर आला हा संविधानावर दरोडा घालू पहाणार्या टोळीला सामील झालेला निकम्मा नाग.
फेसबुक प्रमाणेच इन्स्टाग्रामवरी एक पोस्ट टाकून किरण माने यांनी निकम यांच्यावर टीका केली. या पोस्टमध्ये त्यांनी निकम यांच्या पत्रकार परिषदेतील एक प्रश्न आणि त्यावर निकम यांनी दिलेले उत्तर उद्धृत केले आहे. “तुम्ही वर्षा गायकवाड यांचे आव्हान कसे पेलणार”, असा प्रश्न निकम यांना पत्रकाराने विचारला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, “माझा जन्म हनुमान जयंतीचा आहे.” असला हास्यास्पद, बालीशबुद्धी, निकम्मा माणूस महाराष्ट्रात विद्वान कायदेतज्ज्ञ म्हणून आजवर मिरवत होता, अशी टीका करत किरण माने यांनी उज्वल निकम यांच्यावर टीकेची तोफ डागली.
उज्वल निकम हे देशातील प्रसिद्ध वकील आहेत. विशेष सरकारी वकील म्हणून काम करताना त्यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटला, गुलशन कुमार मर्डर केस, 2008 चा मुंबई हल्ला ते खैरलांजी आणि कोपर्डी सारखे अत्यंत संवेदनशील खटले हाताळल्याने महाराष्ट्रात त्यांच्या नावाची एक क्रेझ आहे. भाजपने उत्तर मध्य मुंबईत त्यांना तिकीट देऊन मोठा मास्तरट्रोक खेळला असल्याचे बोललं जात आहे.