औरंगाबाद | भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सोमवारी मिनी घाटी चिकलठाणा येथील हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच वरिष्ठ डाॅक्टरांसह अधिका-यांनाही मार्गदर्शक सूचनाही यावेळी केल्या.
दरम्यान, यावेळी हाॅस्पीटलमधील कामकाजाची पाहणी केली असता अनेक त्रुटी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या. यामध्ये ऑक्सिजन लाईन घोटाळा, बायोगॅस लाईन गेल्या अनेक महिन्यांपासून धूळ खात पडून असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी तेथील बिकट परिस्थितीबाबत त्यांनी प्रशासनाला खडेबोल सुनावले.
कोवीड कचरा, ऑक्सिजन, व्हेंटीलिटर, बेड, गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे शल्यचिकित्सक एस. व्ही. कुलकर्णी यांना सांगून आवश्यक त्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित केले. यावेळी खासदार डाॅ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, संजय केनेकर, बापू घडामोडे, संजय चौधरी, जगताप, दीपक कोटकर, ठुबे, भगवान शहाणे, अतुल घडामोडेंसह पोलीस, डाॅक्टर्स, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.