काय चाललंय काय? आता TMC नेत्याच्या घरी सापडलं EVM, व्हिव्हीपॅट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपूर्वी भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने देशभरात एकच खळबळ माजली होती. आता पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट सापडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नक्की चाललंय काय? हा प्रश्न आता सर्वसामान्य माणसाला पडतो आहे.

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे. दरम्यान हावडा येथील उलुबेरिया नॉर्थ मध्ये एका तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या घरी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट सापडल्याची घटना घडली. या घटनेने मात्र एकच खळबळ माजली आहे.

उलुबेरिया उत्तर मधून असलेले भाजपचे उमेदवार चिरेन बेरा यांनी आरोप केला की तुलसी बेरिया चे टीएमसी नेता गौतम घोष यांना लोकांनी ईव्हीएम आणि चार व्हीव्हीपॅट सह पकडलं. त्यानंतर या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर केंद्रीय दल आणि पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लोकांवर लाठीमारही करावा लागला या घटनेनंतर गौतम घोष यांना ताब्यात घेण्यात आला आहे.

एका अधिकाऱ्याचे निलंबन

याबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या तपासात ही ईव्हीएम मशीन अतिरिक्त आरक्षित मशीन पैकी वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं परंतु या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे आणि याचा लवकरच अहवाल सार्वजनिक केला जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेनंतर एका अधिकाऱ्याचं निलंबन ही करण्यात आले आहे.

Leave a Comment