किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी घेतले ताब्यात

kirit somaiyya
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशन वरती ताब्यात घेतलेले आहे. मंगळवार दि. 20 रोजी पहाटे साडेचारच्या दरम्यान किरीट सोमय्या कोल्हापूर कडे जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या वरती गेल्या दोन- तीन दिवसापूर्वी किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी ते कोल्हापूरला जाणार होते. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात येण्यास मज्जाव केला होता. तसेच प्रक्षोभक वक्तव्ये केली आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास येऊ नये म्हणून नोटीस दिली होती. मात्र तरीही किरीट सोमय्या हे महालक्ष्मी एक्सप्रेस मधून मुंबईतून कोल्हापूरकडे रविवारी रात्री रवाना झाले होते. मात्र सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कराड येथील पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून किरीट सोमय्या यांना ताब्यात घेतलेले आहे.

यावेळी ओगलेवाडी येथील रेल्वे स्थानकावर दोनशेहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त होता. भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशन उपस्थित होते. किरीट सोमय्या यांना पोलीस बंदोबस्तात त्यांना ताब्यात घेऊन येथील शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले आहे.

https://www.facebook.com/1506067669510655/posts/4287985877985473/