Wednesday, February 8, 2023

कोरोनाचे संकट टळलेले नाही, प्रशासनाला सहकार्य करा : पालकमंंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आज अनंत चतुर्दशीचा दिवस, गेली दहा दिवस मोठ्या उत्साहाने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. गेल्यावर्षी कोरोनाच्या तीव्र सावट गणेशोत्सवार होत, यावर्षी थोडी शिथिलता आली. त्यामुळे सर्व ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने सजारा केला. दहा दिवसांमध्ये लोकांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य केलेले आहे. परंतु इथून पुढेही काळजी घेणे आवश्यक आहे, कारण कोरोनाच्या संकट पूर्णपणे टळलेले नाही आणि त्यादृष्टीने सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

- Advertisement -

कराड येथील कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर विसर्जसनासाठी आलेल्या सार्वजनिक व घरगुती गणपतींची आरती सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विसर्जसनासाठी नदीपात्रात असणाऱ्या बोटींची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य त्या सूचना संबंधितांना दिल्या. याप्रसंगी कराड नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक विजय वाटेगावकर, नगरसेवक हणमंत पवार, नगरसेविका सौ.अंजली कुंभार, जयंत बेडेकर,अख्तर आंबेकरी, सामाजिक कार्यकर्ते, दादासाहेब शिंगण, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी व भाविक भक्त उपस्थित होते.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले,सण साजरा करत असताना प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व नियमांचे पालन करण्यात आले, आज जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी शांततेणे गणेश विसर्जन सुरू आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे त्या त्या विभागातील नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून विसर्जन केले जात आहे. कराडला गेल्या वर्षी प्रमाणे नगरपालिकेने प्रीतिसंगमावर एक चांगल्या प्रकारची सुविधा केली आहे. एकूण 18 ट्रॅक्टर कराड परिसरामध्ये आणि त्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून गणेशमूर्ती संकलन करून प्रीतिसंगमावर आणल्या जातात व विधिवत आरती करून नगरपालिका आणि सामाजिक संस्था यांच्या बोटींद्वारे खोल पाण्यामध्ये मूर्तींचे विसर्जन केले जाते.