हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज कराड येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा एकदा भ्रष्ट्राचाराचे गंभीर आरोप केले आहेत. मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथील साखर कारखान्यात अजून 100 कोटींचा घोटाला केला असल्याचा आरोप सोमय्या यांनी म्हंटल.
मुश्रीफ परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला. यामध्येही शेल कंपन्यांद्वारे पैसे उभारले. बोगस अकाऊंट उघडून कॅश टाकायचे आणि पैसे घ्यायचे, १०० कोटी रुपये घेतले. असून गडहिंगल्ज कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार आहे असे सोमय्यांनी म्हंटल आहे.
ही तर ठाकरे सरकारची दडपशाही-
दरम्यान, पोलिसांनी सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सरकार वर गंभीर आरोप केले आहेत. ही तर ठाकरे सरकारची दडपशाही आहे. ठाकरे सरकारने माजी सुरक्षा काढून घेतली, मोदी सरकारने मला संरक्षण दिलं. राष्ट्रवादीच्या भाई लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे असं सोमय्या यांनी म्हंटल. ,उद्धव ठाकरेंची इच्छा आहे किरीट सोमय्ायंवर हल्ला व्हावा, याचं उत्तर दिलीप वळसे पाटील यांना द्वावं लागेल.