Tuesday, June 6, 2023

“महाभयंकर कोरोनाची लस मी घेतली नाही आणि घेणारही नाही”; कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सबंध देशभर महाभयंकर अशा कोरोनाने हाहाकार माजवला. यामध्ये लाखो लोक मृत्युमुखी पावले. राज्यातही कोरोना रुग्णांना मृत्यू झाला. यावर औपाय म्हणून आरोग्य यंत्रणेकडून कोवॅक्सीन लस उपलब्ध करण्यात आली आहे. अजूनही कोरोना नाहीसा झालेला नसल्याने याबाबात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “मी लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही,” असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे.

कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी नुकतेच एका कार्यक्रमात कोरोना लसीबाबत महत्वाचे विधान केले आहे. मी अजूनही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही आणि घेणारही. ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी असते. हे प्रत्येक व्यक्तीला कळायला नको का? प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. या जगात कोरोना सारख्या महाभयंकर रोगाला एकच औषध आहे ते म्हणजे मन खंबीर असायला हवे. आपले मन जर खंबीर ठरिवले तर काहीही तुम्हाला होऊ शकत नाही.

कार्यक्रमावेळी कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी रामायणातील श्रीरामाच्या वनवासाची कथा सांगितली. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इकडे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकवून पाहिला नाही,” असे इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे.