किसनवीर कारखाना निवडणूक निकाल : पहिल्या फेरीत सत्तांतरांकडे वाटचाल, कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वाई तालुक्यातील भुईंज येथील किसन वीर साखर कारखान्यांच्या निवडणूकीत एकतर्फी सत्तांतर होण्याकडे पहिल्या फेरीत कल दिसून आला आहे. कारण तब्बल ऊस उत्पादक गटातील 5 गटातील 15 उमेदवार हे किसनवीर बचाव शेतकरी पॅनेल आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत तब्बल 3 हजार 600 ते 4 हजार मतांनी कपबशी पुढे असून विमान पाठीमागे राहिले आहे. त्यामुळे आ. मकरंद पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण सुरू केली आहे.

भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेल विरूध्द माजी आमदार व कारखान्याचे माजी चेअरमन मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेल अशी चुरशीची लढत होईल अशी अपेक्षा होती. मात्र, पहिल्या फेरीतील आलेल्या मतांच्या आकडेवारीमुळे एकतर्फी निवडणूक होवून सत्तांतर होण्याकडे सुरूवात झाली असल्याचे सध्याच्या आकडेवरून दिसत आहे. या निवडणुकीत 69 टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज वाईतील श्रीनिवास मंगल कार्यालय एमआयडीसी येथे सुरू आहे.

गट 1 – कवठे खंडाळा ऊस उत्पादक- चिन्ह- कपबशी- रामदास(बाळासाहेब)गाढवे-10, 810,नितीन पाटील-जाधव-10, 877,काळोखे किरण-10, 771                                    चिन्ह- विमान- दत्तात्रय गाढवे- 6, 863, प्रवीण जगताप- 6, 807, प्रताप यादव- 6, 801

गट 2 – भुईंज ऊस उत्पादक –चिन्ह- कपबशी- प्रकाश धरगुडे- 10, 583, रामदास इथापे- 10, 497, प्रमोद शिंदे-10, 451

चिन्ह- विमान- मदन भोसले 7, 081, दिलीप शिंदे- 6, 669, जयवंत पवार- 6, 885, अपक्ष- मानसिंग शिंगटे- 75

गट 3 – बावधन ऊस उत्पादक- चिन्ह- कपबशी- दिलीप पिसाळ- 10,907, शशिकांत पिसाळ- 10, 757, हिंदुराव तरडे- 10, 712

चिन्ह- विमान- सचिन भोसले- 7,001, विश्वास पाडळे- 6,808, चंद्रसेन शिंदे -6, 708

गट 3 – सातारा ऊस उत्पादक- चिन्ह- कपबशी- संदीप चव्हाण- 10, 869, सचिन जाधव- 10, 816, बाबासाहेब कदम- 10, 735

चिन्ह- विमान- चंद्रकांत इंगवले- 6, 847, भुंजगराव जाधव 6, 883, अनिल वाघमळे 6, 590,-अपक्ष- नवनाथ साबळे 61

गट 3 – कोरेगाव ऊस उत्पादक  –चिन्ह- कपबशी- ललित मुळीक- 10, 584, संजय फाळके- 10, 579, सचिन साळुंखे- 10, 719

चिन्ह- विमान- मेघराज भोईटे- 6, 950, नवनाथ केंजळे- 6, 754, शिवाजी पवार- 6, 752,- अपक्ष- दिलीप जाधव- 52, रमेश माने- 39