किसनवीर कारखाना निकाल : महिला राखीव गटात कपबशी 4 हजारांनी आघाडीवर

Kisanveer Sugher
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

किसन वीर कारखाना निवडणुकीत मतमोजणी महिला राखीव गटातील दोन जागांमध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेलच्या महिला पहिल्या फेरीत आघाडीवर आहेत. यामध्ये सुशीला जाधव यांना 10 हजार 915 सरला श्रीकांत वीर 10 हजार 710 मते मिळाली आहेत. तर विरोधी आशा फाळके यांना 6 हजार 971 तर विजया साबळे यांना 6 हजार 877 मते मिळाली आहेत.

भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर कारखाना बचाव शेतकरी पॅनेल विरूध्द माजी आमदार व कारखान्याचे माजी चेअरमन मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेल अशी चुरशीची लढत सुरू आहे. या निवडणुकीत 69 टक्के मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज वाईतील श्रीनिवास मंगल कार्यालय एमआयडीसी येथे सुरू आहे. सुरूवातीलाच सत्ताधारी पॅनेलला मोठे धक्के बसत असताना आता महिला राखीव गटातही सत्ताधारी गट पिछाडीवर पडलेला आहे. त्यामुळे सत्तांतर वाटचाल सुरू असल्याचे सध्यातरी दिसत आहे.

महिला राखीव गट (पहिल्या फेरीतील मते खालीलप्रमाणे)

सरला श्रीकांत वीर- (कपबशी- आघाडीवर) 10710
सुशीला भगवानराव जाधव- (कपबशी- आघाडीवर)  10215
आशा दत्तात्रय फाळके- (विमान- पिछाडीवर)- 6971
विजया जयवंत साबळे – (विमान- पिछाडीवर)- 6877