हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लांब राहूनही आपण किसचा अनुभव घेऊ शकतो असं कोणी तुम्हाला म्हंटल तर अनेकजण तुम्हाला वेड्यात काढतील. परंतु हा तंत्रज्ञानाचा जमाना आहे. तंत्रज्ञान कधी काय घेऊन येईल याचा काही नेम नाही. चीनमधील एका विद्यापीठातील मुलांनी एक असेच एक उपकरण तयार केलं आहे. ज्याच्या मदतीने लांब राहूनही आपण आपल्या साथीदारासोबत खराखुरा किस केल्याचा फिलिंग घेऊ शकतो. या तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.
कामानिमित्त किंवा वेगवेगळ्या कारणांनी अनेक झोडपी एकमेकांपासून लांब राहतात. त्यामुळे एकमेकांना मिठी मारणंही त्यांना शक्य नसत. लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशिप मुळे नैराश्य सुद्धा येऊ शकत. त्यामुळे या सर्वावर मात करण्यासाठी एका चिनी विद्यापीठाने एका अप्रतिम उपकरणाचा शोध लावला आहे. या उपकरणाला माणसांप्रमाणेच ओठ लावलेले आहेत. तुम्हाला सर्वप्रथम हे डिव्हाइस एका अॅपशी कनेक्ट करावं लागेल. या उपकरणावरील ओठांवर जेव्हा तुमचा पार्टनर चुंबन घेईल तेव्हा तुमच्या हातातील डिव्हाईस सुद्धा तुम्हांला तितक्याच उर्जेने किसचा फिलिंग देते. तुमचा पार्टनर तुमच्या जवळच आणि अगदी समोर आहे अशीच फिलिंग तुम्हाला त्यावेळी येईल.
https://www.instagram.com/reel/Cqfp-a8pSfE/?igshid=YmMyMTA2M2Y%3D
हे किसिंग उपकरण तुमच्या पार्टनरच्या ओठांची हुबेहूब प्रतिकृती तयार करते. या उपकरणातून किसिंगचा आवाजही येतो. त्यामुळे असं फील होतंय कि खरच आपण आपल्या पार्टनरसोबत किस करतोय. सध्या या किसिंग डिव्हाईसची चर्चा संपूर्ण जगात सुरु आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या पार्टनरपासून लांब राहत असाल आणि त्यांना मिस करत असाल तर हे किसिंग डिव्हाईस नक्की खरेदी करा.