हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2021 आता काही दिवसात सुरू होणार असून खेळाडूंची कोरोना चाचणी आणि सराव चालू आहे. दरम्यान भारताचा माजी फिरकीपटू आणि कोलकाता नाईट रायडर संघाचा खेळाडू हरभजन सिंगचा एक विडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंग प्रशिक्षणसाठी मैदानात उतरला आहे. बीसीसीआयच्या अनिवार्य 7 दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीनंतर हरभजनने शनिवारी केकेआरच्या बायो-बबलमध्ये प्रवेश केला. केकेआरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हरभजनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भज्जी हॉटेलच्या खोलीतून बाहेर येताना आणि प्रसिद्ध पंजाबी गाण्यावर भांगडा करताना दिसत आहेत.
https://www.instagram.com/stories/kkriders/2543656227965389300/?utm_source=ig_story_item_share&igshid=4oi36026bhsu
व्हिडिओमध्ये, जेव्हा हरभजन हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडतो, तेव्हा त्याला कारण विचारले जाते. तेव्हा तो माझी चाचणी झाली आहे, आणि आता मी सरावासाठी जात आहे, असे सांगतो. या उत्तरानंतर एक पंजाबी गाणे सुरू होते आणि भज्जी भांगडा करत पुढे जातो.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group