हॅलो महाराष्ट्र । न्यूझीलंड विरुद्धच्या दुसर्या टी -२० सामन्यात भारताने ७ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडने भारतासमोर ठेवलेलं १३३ धावांच भारतीय संघाने केवळ १७.३ षटकांत गाठले. भारताचा हा विजय के. एल राहुलच्या झुंझार खेळीने साकारला गेला. या सामन्यात के एल राहुलने ५० चेंडूत नाबाद ५७ धावा केल्य. केएल राहुलच्या सामन्यातील कामगिरीमुळं प्रभावित झालेल्या माजी क्रिकेटर वीरेंदर सेहवागने राहुलचे कौतुक करताना रिषभ पंतवर टीका केली.
‘पंत फक्त बोलतो आणि केएल राहुल करून दाखवतो’
वीरेंद्र सेहवागने क्रिकेट वेबसाइट क्रिकबझ यांच्याशी केलेल्या खास संभाषणात म्हटलं,”केएल राहुलने खेळपट्टी आणि परिस्थितीनुसार फलंदाजी केली, तर रिषभ पंत केवळ परिस्थितीनुसार खेळत असल्याचे सांगतो पण तो तसे कधीही करत नाही. सेहवाग पुढे म्हणाला, ‘राहुलची या सामन्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याने यावेळी ५० चेंडूत ५७ धावा केल्या आहेत, त्यापूर्वी त्याने २५ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. रिषभ पंत फक्त बोलतो की मी परिस्थितीनुसार खेळतो पण मी त्याला कधीही असं खेळताना पाहिले नाही. केएल राहुल खऱ्या अर्थाने परिस्थितीनुसार खेळतो. पंतने त्यांच्याकडून शिकले पाहिजे.
के.एल. राहुलला पंतच्या जागी विकेटकीपिंगची जबाबदारी सोपवली गेली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान पंतच्या डोक्यावर मार लागला होता आणि त्यानंतर तो तंदुरुस्त असूनही संघात स्थान मिळवू शकलेला नाही. विकेटकीपिंग करत असलेल्या केएल राहुलने स्वत: ला सिद्ध केले आहे. राहुलच्या फॉर्मवर विकेटकीपिंगचा कोणताही परिणाम दिसला नाही. त्याने शेवटच्या ५ पैकी ४ टी -२० सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा
हे पण वाचा-
CAA, NRC लागू होणं हा जिनांचा विजय- शशी थरुर
कोल्हापुरात शिवभोजन योजनेला सुरुवात; मंत्री सतेज पाटीलांनी शिवथाळीचा घेतला आस्वाद
विधानपरिषद बरखास्तीचा आंध्र प्रदेश सरकारचा निर्णय; विधानपरिषदेत संख्याबळ नसल्यामुळे घेतला निर्णय?