व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

विराट कोहली सलामीला येणार की राहुल?? रोहितने केलं स्पष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणीस्थान विरोधात विराट कोहलीने सलामीला येऊन तडाखेबंद शतक झळकावले होते, त्यानंतर आगामी विश्वचषक स्पर्धेतही विराटने सलामीला खेळावे अशा चर्चा सुरु होत्या, त्याच पार्श्वभूमीवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने एक मोठं विधान केल आहे. सलामीवीर म्हणून विराट कोहली हा संघासाठी फक्त एक ऑप्शन आहे, राहुलच ओपनिंग करेल असे रोहितने म्हंटल. भारतीय संघ 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. यापूर्वीच रोहित शर्माने पत्रकार परिषदेत मोठे वक्तव्य केले आहे.

पत्रकारांशी बोलताना रोहित म्हणाला, “तुमच्याकडे पर्याय उपलब्ध असणे नेहमीच चांगले असते. विश्वचषकात जाण्यासाठी तुमच्यात लवचिकता असणे महत्त्वाचे आहे. खेळाडूंनी कोणत्याही परिस्थितीत सर्वोत्तम फलंदाजी करावी अशी तुमची इच्छा आहे. जेव्हा आपण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो याचा अर्थ असा नाही की काही प्रॉब्लेम आहे.

विराट कोहली हा आमचा तिसरा सलामीवीर आहे. आशिया चषकाच्या शेवटच्या सामन्यात तो ज्या प्रकारे खेळला त्यामुळे आम्ही खूश आहे , पण केएल राहुल विश्वचषकात सलामीला खेळले. त्याच्या कामगिरीकडे काही वेळा दुर्लक्ष केले जाते. तो टीम इंडियासाठी एक अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. तो एक दर्जेदार खेळाडू आहे. टॉप ऑर्डरमध्ये त्यांची उपस्थिती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं म्हणत राहुलच ओपनिंग करेल असं रोहितने स्पष्ट केलं.

दरम्यान, विराटने आशिया कपमध्ये शेवटच्या सामन्यात सलामीला उतरून फलंदाजी केली होती आणि नाबाद 122 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधले हे त्याचे पहिले शतक आणि T20I मधील कोणत्याही भारतीय फलंदाजाची सर्वात मोठी खेळी होती. येव्हडच नाही तर आयपीएल मध्येही अनेकदा विराटने सलामीला उतरून फलंदाजी केली आहे.