Friday, June 2, 2023

पुण्यात दिवसाढवळ्या सराफा व्यापाऱ्यावर चाकूने हल्ला

पुणे : हॅलो महाराष्ट्र – डोंबिवलीमध्ये काही दिवसांपूर्वी एका सराफा व्यापाऱ्यावर दुकानात शिरून चाकू हल्ला (knife attack on jewelers) केल्याची घटना ताजी असताना पुण्यात अशीच घटना समोर आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिवसाढवळ्या घडली आहे. यामध्ये एका सराफा व्यापाऱ्यावर चाकू हल्ला (knife attack on jewelers) करण्यात आला आहे. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय घडले नेमके ?
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दत्तनगर येथील वैभवलक्ष्मी ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला. यावेळी चोरीच्या उद्देशाने आलेल्या आरोपीने सराफा व्यापाऱ्यावर जीवघेणा चाकू हल्ला (knife attack on jewelers) केला आहे. तो हल्लेखोर दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आला होता. बराच वेळ तो आतमध्ये बसलेला होता. यानंतर त्याने दुकानात कुणी येत नाही, याची संधी साधून बॅगेतून चाकू काढला आणि सराफावर हल्ला केला.

सराफाने मोठ्या हिंमतीने त्याचा हल्ला परतावून लावला. त्यांनी या चोराच्या हातातून चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला. सराफाच्या जोरदार प्रतिकार केल्यामुळे चोरटा चांगलाच घाबरला आणि त्याने दुकानातून धूम ठोकली. मात्र या झटापटीत सराफ व्यापाऱ्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी सराफा व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये चाकू हल्ला (knife attack on jewelers) करणाऱ्या अरोपीविरोधात गून्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल