औरंगाबाद – आज शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. अतिशय क्षुल्लक कारणावरून हल्ला करण्याच्या घटना दिवसेंदिवस मोठ्याप्रमाणावर वाढतच आहेत. अशीच एक घटना शहरातील मोंढा नाका उड्डाणपुलाजवळ घडली आहे.
समोसा देण्यास उशीर होताच एकाने चाट भंडार मालकावर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना शहरातील मोंढा नाका उड्डाणपुलाजवळ सात ऑक्टोबरला रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. रोहित श्रीवास्तव (36) असे जखमीचे नाव असून रुपेश इंगळे (22) असे आरोपीचे नाव आहे आरोपीवर जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोंढा नाका उड्डाणपुलाजवळ रोहित श्रीवास्तव हे चाट भंडारा ची गाडी चालवतात. रात्री आठ वाजेच्या सुमारास रुपेश इंगळे हा समोसा खाण्यासाठी आला होता. समोसा देण्यास रोहित कडून उशीर झाल्याने रुपेशने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. या प्रकरणी रोहितच्या तक्रारीवरून जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.