Tuesday, January 31, 2023

आम्ही 100% प्रयत्न केला, आमचे पाठीराखे आजही आमच्यासोबत- रोहित शर्मा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध विजय मिळवून देखील गतविजेत्या मुंबई इंडिअन्स चा संघ आयपीएल मधून बाहेर पडला. प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवण्यासाठी मुंबईला तब्बल 170 धावांनी विजय मिळवन्याच अशक्य आव्हान होत. मुंबईने दमदार फलंदाजी करत 235 धावांचा डोंगर उभा केला. मात्र 170 धावांनी विजय मिळवण्यात मुंबईला अपयश आले. दरम्यान, आम्ही 100% प्रयत्न केला, मात्र आमचे पाठीराखे वाईट काळातही आमच्यासोबत असतील, असा विश्वास कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला.

मॅच संपल्यानंतर रोहित म्हणाला, ‘आम्ही जे साध्य केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही आमच्या परीने 100 टक्के दिलं. मला खात्री आहे मुंबईचे चाहते आमच्या खेळीवर खूश असतील. ‘जेव्हा तुम्ही मुंबईसारख्या फ्रँचायझीसाठी खेळता, तेव्हा तुमच्याकडून नेहमी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. मी याला दबाव म्हणणार नाही.

- Advertisement -

मागील चार हंगामात आम्ही संघ म्हणून उत्तम कामगिरी केली. पण यंदा आम्ही आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकलो नाही, याची निश्चित खंत आहे. पण आमचे पाठीराखे आमच्यासोबत असतील, याची खात्री वाटतीय. चांगल्या काळात जसे ते आमच्याबरोबर असतात तसेच वाईट काळातही ते आमच्यासोबत असतील, असा विश्वास देखील रोहितने यावेळी व्यक्त केला आहे.