पोलिस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टरांच्या कॅबिनमध्येच एकावर चाकू हल्ला; कराड शहरातील घटनेने खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या दालनात एकावर चाकूने वार केल्याची घटना सोमवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. बी. आर. पाटील यांनी तात्काळ मारेकर्‍यास ताब्यात घेतले. व जखमीस उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले.

किशोर पांडुरंग शिखरे (वय 30, रा. हजारमाची, ता. कराड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर लखन भागवत माने (वय 40 रा. हजारमाची ता. कराड) असे हल्लेखोराचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हल्लेखोर लखन माने याचे जखमी किशोर शिखरे याचे वडिलांशी असलेल्या जुना वादाच्या कारणातून मागील आठवड्यात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती.

त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी किशोर शिखरे व लखन माने या दोघांना बोलवण्यात आले होते. त्यावेळी लखन माने याने बी. आर. पाटील यांच्या दालनात शिखरेवर चाकूने तीन ठिकाणी वार केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी तात्काळ मारेकर्‍यास ताब्यात घेतले. व जखमीला उपरासाठी रूग्णालयात उपचारसाठी दाखल केले.

पहा व्हिडिओ बातमी –

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जाॅईन करा

Click Here to Join WhatsApp Group

You might also like