बनावट नोटा आणि तस्करीविरूद्ध मोहीम चालवणारे एकमेव बिगर-सरकारी मंच FICCI CASCADE कसे काम करते ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली बनावट नोटांची तस्करी आणि हेराफेरी यासह जगभरात आज होत असलेले अवैध व्यापारी उपक्रम, बहरंगी अब्जावधी डॉलर्सच्या अवैध उद्योगाचा भाग बनले आहेत. जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा किती वाईट परिणाम होत आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. एका अंदाजानुसार हे अवैध व्यवसाय जगातील सर्वात मोठे उद्योग म्हणून विकसित होत आहेत. हा व्यवसाय साडे सहाशे मिलियन ते तीन ट्रिलियन डॉलर्स दरम्यान आहे असे अनेक अभ्यासांमध्ये मानले जात आहे. हा घोटाळा जगभरातील व्यापाराच्या 10 टक्के झाला आहे आणि अमेरिकन एजन्सी FBI वर विश्वास ठेवला तर 21 व्या शतकातील हा सर्वात मोठा गुन्हा ठरला आहे. जगातील देशांच्या अर्थव्यवस्थेवरच याचा दुष्परिणाम होत नाही तर याद्वारे भूमिगत कार्यांसह गुन्हेगारी कारवाया देखील नियंत्रित होतात. या समांतर अर्थव्यवस्थेमुळे सरकारांना महसूल आणि टॅक्सचा तोटा सहन करावा लागत आहे, याचा जनहिताच्या कामांवर देखील परिणाम होत असून करदात्यांवरील ओझेही वाढत आहे, तसेच धोकादायक आणि निरुपयोगी वस्तू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत.

त्यांच्यावरील नाकेबंदी घट्ट करण्यासाठी जगातील सरकारे कडक कायदे बनवत आहेत आणि ते पूर्ण ताकदही लावत ​​आहेत. सरकारच्या या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी भारतात पहिल्यादांच एका स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला आहे. FICCI या व्यवसाय मंडळाने सरकारला या फसवणूकीविरुद्ध लढा देण्यासाठी मदत करण्यासाठी CASCADE नावाचा एक मंच तयार केला आहे. CASCADE म्हणजे Committee Against Smuggling & Counterfeting Activities Destroying the Economy याची स्थापना जानेवारी 2011 मध्ये झाली. आता या फोरमचे अध्यक्ष अनिल राजपूत आहेत, जे उद्योगाशी संबंधित आहेत आणि सध्या ITC कंपनीतील कॉर्पोरेट व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत. अनिल राजपूत म्हणतात की,” या बेकायदेशीर व्यवसायांचे उत्पन्न आता बहुतेक दहशतवादी फ़ंडींगसाठी होते. म्हणूनच, आपण, सरकार आणि उद्योग यांनी सर्वांना हा संबंध समजून घेण्याची गरज आहे जेणेकरून त्याचा प्रभाव संपूर्ण जगात काढून टाकता येईल.”

जगभरात सुरू असलेल्या या बेकायदेशीर धंद्यातून कशी मुक्तता करता येईल याकडे हा मंच आपले संपूर्ण लक्ष आणि रिसर्च करीत आहे. अवैध तस्करीशी संबंधित या मुद्द्यांवर CASCADE लक्ष केंद्रित करीत आहे

याचा विपरित परिणाम कायद्याच्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या उद्योगांवरही होतो.

ग्राहकांचे आरोग्य आणि सुरक्षा धोक्यात येत आहे

बेकायदेशीर उद्योग भरभराट होत आहेत.

सरकारला तोटा होत आहे.

सामान्य माणसाच्या वेलफेयरचे ओझे आणि एजन्सीवरील खर्चाचा बोजवारादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

काळ्या पैशाची संख्या वाढत आहे.

गुन्हेगारी वाढत आहे.

यातच FICCI CASCADE आपली भूमिका साकारत आहे. हा मंच उद्योग, ग्राहक, मीडिया, कायदेशीर तज्ञ, ग्राहक मंच, धोरण निर्माते यांच्या सहकार्याने जागरूकता निर्माण करण्यात गुंतलेला आहे. आपल्या संशोधन आणि अभ्यास आणि विश्लेषणाद्वारे हे सर्वांना सांगत आहे की, ही लबाडी ग्राहक, सामान्य लोकांच्या आणि कर चुकवण्याच्या सुरक्षेला कशी चालना देत आहे. हा अवैध व्यापार हा देशातील सर्वात धोकादायक शत्रूंपैकी एक असल्याचे CASCADE चे अध्यक्ष अनिल राजपूत यांचे म्हणणे आहे. यामागील एक मोठे कारण आपली स्वतःची धोरणे आहेत, ज्यात दोष निर्माण करून काळा व्यवसाय करणारी लोकं केवळ यंत्रणेतच प्रवेश करत नाहीत तर त्याचा फायदाही घेत आहेत.

येथूनच FICCI CASCADE ची भूमिका समोर येऊ लागली आहे. या मंचाने चार मुद्द्यांची निवड केली आहे, त्यांना आधार बनवून ते जागरूकता वाढवित आहेत. पहिले जागरूकता वाढविणे आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सीजसाठी जगभरातील माहिती आणणे. हा मंच पूर्णपणे रिसर्चमध्ये गुंतलेला आहे आणि धोरण निर्मात्यांना कालबाह्य कायदे आणि एजन्सींमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत आहे. CASCADE देशातील प्रमुख धोरणकर्त्यांसमवेत जगभरातील उत्तमोत्तम पद्धतींबद्दल माहिती शेअर करत आहे. अर्थात, जेव्हा केंद्र सरकार काळ्या पैशाविरूद्ध आणि काळ्या धंद्याविरूद्ध आपला लढा अखेरपर्यंत नेण्याचा प्रयत्न करीत आहे, तेव्हा असे मंच त्यासाठी उपयुक्त ठरत आहेत.

Leave a Comment