हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मामध्ये दिवाळी सणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. दिवाळी सणाला दुसऱ्या शब्दात दीपोत्सव उत्सव देखील म्हणले जाते. दिवाळी सण भारतातच नाही तर जगभरात साजरी केला जातो. या सणात घर सजवणे, फटाके फोडणे, दिवे लावणे, नवीन कपडे घेणे, फराळ बनवणे , अशा कित्येक गोष्टी उत्साहाने केल्या जातात. विशेष म्हणजे, दिवाळीच्या दिवशी आपण धनसंपत्तीची देवी लक्ष्मी, श्रीगणेश आणि देवी सरस्वती यांची पूजा करतो. या देवी देवतांकडे आपण घराची सुख समृद्धी आणि शांती मागतो.
दिवाळी आणि लक्ष्मीपूजन कधी
दिवाळी हा सण कार्तिक अमावस्येच्या दिवशी साजरी केला जातो. त्यानुसार यंदा आपण 12 नोव्हेंबर 2023 रोजी नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन साजरी करून दिवाळी धुमधडाक्यात साजरी करू. यावर्षी कार्तिक अमावस्या 12 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2:44 वाजता सुरू होईल आणि ती 13 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 2:56 वाजता संपेल. म्हणजेच आपण उदय तिथीनुसार 12 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करणार आहोत.
लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त
पंचांगानुसार यंदाची दिवाळी 12 नोव्हेंबर रोजी आली आहे. यानुसार, गणेश पूजन आणि लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:40 पासून सुरू होऊन 7:36 पर्यंत असेल. परंतु, महानिशीथकालचा शुभ मुहूर्त रात्री 11:49 ते 12:31 पर्यंत असेल. यामधील सर्वात शुभ मुहूर्त महानिशीथकालचा असेल. या कालावधीमध्ये तुम्हाला लक्ष्मी देवीची पूजा करता येईल. तसेच या मुहूर्तामध्ये आपल्याला श्री गणेशा आणि सरस्वतीची ही पूजा करता येईल. पंचागणाच्या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन केल्यानंतर आपल्याला सुख-समृद्धीसह आर्थिक लाभ मिळेल. तसेच देवीची कृपा आपल्यावर कायम राहील.