Income Tax Return भरण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर लगेच जाणून घ्या

Income Tax Return
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अनेक लोकांना असे वाटते की आयकर रिटर्न (Income Tax Return) फक्त कर भरावा लागणाऱ्या नागरिकांसाठी बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात असे नाही. जरी तुम्हाला कर भरण्याची गरज नसली, तरीही ITR भरणे अनेक कारणांसाठी फायदेशीर ठरू शकते. ITR भरण्याचे नेमके फायदे कोणते आहेत हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. कर परतावा मिळण्याची संधी

उत्पन्नाच्या वेगवेगळ्या स्रोतांवर टीडीएस (TDS) कपात केली जाते. जर तुम्ही वर्षभरात तुमच्या उत्पन्नाच्या तुलनेत जास्त कर भरला असेल, तर ITR भरल्यानंतर तुम्हाला कर परतावा (Tax Refund) मिळू शकतो. त्यामुळे कोणताही अतिरिक्त कर भरला गेला असेल तर तो परत मिळवण्यासाठी ITR भरावेच लागते.

२. आर्थिक नोंदींचा स्पष्ट हिशोब

आयकर रिटर्न हे आर्थिक व्यवहारांचे अधिकृत दस्तऐवज असतात. भविष्यात एखाद्या वित्तीय चौकशीसाठी किंवा आर्थिक परिस्थिती सिद्ध करण्यासाठी हे उपयोगी ठरू शकतात.

३. व्हिसा प्रक्रिया सुलभ होते

तुमची परदेशात जाण्याची योजना असेल तर व्हिसा अर्ज करताना अनेक देशांचे दूतावास मागील दोन ते तीन वर्षांचे ITR दाखल करण्यास सांगतात. यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर आणि जबाबदार नागरिक असल्याचे सिद्ध होते, त्यामुळे व्हिसा मिळण्याच्या शक्यता वाढतात.

४. कर्ज घेण्यासाठी आवश्यक

गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा व्यवसाय कर्ज घेण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्था अर्जदाराचा ITR तपासतात. आर्थिक स्थैर्याचा पुरावा म्हणून मागील दोन-तीन वर्षांचे ITR महत्त्वाचे ठरते.

५. क्रेडिट स्कोअर सुधारतो

नियमितपणे ITR भरल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारतो. उत्तम क्रेडिट स्कोअर असल्यास बँकांकडून कर्ज घेणे सोपे होते आणि व्याजदरही कमी मिळतो.

६. मोठ्या विमा पॉलिसी खरेदीसाठी उपयुक्त

काही विमा कंपन्या मोठ्या रकमेच्या पॉलिसींसाठी Income Tax Return ची मागणी करतात. त्यामुळे उच्च मूल्याच्या विमा पॉलिसी घेऊ इच्छित असाल, तर तुमच्याकडे नियमित आयकर रिटर्न असणे गरजेचे ठरते.

७. गुंतवणुकीसाठी आवश्यक

शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणुकीसाठी Income Tax Return फायदेशीर ठरतो. काही प्रकारच्या गुंतवणुकींसाठी तर ITR दाखल असणे आवश्यकही असते.

८. भांडवली नफ्यासाठी उपयोगी

व्यवसाय किंवा गुंतवणुकीतून होणाऱ्या भांडवली नफ्यावर कर लागू होतो. जर तुम्हाला कर सवलत किंवा भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी याचा योग्य उपयोग करायचा असेल, तर ITR भरणे आवश्यक ठरते.