हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चिनी मोबाईल कंपनी असलेल्या Vivo कडून या वर्षाच्या अखेरीस जबरदस्त फीचर्स असलेला Vivo X90 हा स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे. अलीकडील काही रिपोर्ट्समध्ये, Vivo X90 Pro आणि X90 Pro + बाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या वर्षी डिसेंबरमध्ये Vivo X90 सीरीज अधिकृतपणे लाँच केली जाणार असल्याचा दावा या रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. आता, लोकप्रिय टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनच्या सौजन्याने आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. ज्यानुसार या Vivo X90 मध्ये 1.5K रिझोल्युशनचा डिस्प्ले असेल. तसेच मागील मॉडेलप्रमाणेच यामध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसहीत AMOLED पॅनेल देखील असेल.

Vivo X90 Series
SoC डायमेंशन 9000 चा उत्तराधिकारी म्हणून पदार्पण करेल ज्याने X80 आणि X80 Pro च्या डायमेन्शन व्हेरियंटला शक्ती दिली. MediaTek कडून पुढील महिन्यात (नोव्हेंबर) डायमेंशन 9200 चिपसेट बाबत घोषणा केली जाऊ शकते. टिपस्टरने यावेळी असा दावा केला आहे की, X90 चे डायमेन्शन 9200 असेल.

Vivo X90 Battery
मात्र या डिव्हाइसमध्ये IP68 सर्टिफिकेशन नसेल. DCS ने हे देखील उघड केले की, Vivo X90 या डिव्हाइसमध्ये 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट मिळेल. त्याचबरोबर टिपस्टरने गेल्या महिन्यात असाही दावा केला होता की, या डिव्हाइसमध्ये 4,700mAh चा ड्युअल-सेल बॅटरी पॅक असेल. यामध्ये Sony IMX8-सीरीज मुख्य कॅमेरा असल्याचाही अंदाज आहे. यामध्ये पुढे खुलासा करण्यात आला की, X80 च्या तुलनेत, X90 धूळ आणि पाण्याला चांगला प्रतिकार करेल.

Vivo X90 Pro+ Battery
X90 सीरीज बाबतच्या अफवांवरून असे दिसून आले की, या दोन्ही मध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट असतील. तसेच हे दोन्ही स्मार्टफोन्स 1-इंचाच्या मुख्य कॅमेरा सेन्सरसह येण्याची अपेक्षा आहे.
याच बरोबर X90 मध्ये 100W चार्जिंगसहित 4,870mAh चा बॅटरी पॅक असेल, तर X90 Pro+ मध्ये 5,000mAh बॅटरी असू शकेल. Pro+ Samsung AMOLED E6 डिस्प्ले, LPDDR5X रॅम आणि UFS 4.0 स्टोरेजसह येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येते आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.vivo.com/
हे पण वाचा :
Interest Rates : ‘या’ चार बँका बचत खात्यावर देत आहेत सर्वाधिक व्याज, नवीन दर तपासा
PNB ने FD वरील व्याजदरात केली वाढ, नवीन व्याज दर तपासा
नवीन बदल अन् फीचर्स सहित पुन्हा लाँच होणार Yamaha RX 100, कंपनीने दिले सूतोवाच
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 4 वर्षांत गुंतवणूकदारांना दिला कोट्यवधी रुपयांचा नफा !!!
Train Cancelled : दिवाळीनंतरही रेल्वेकडून 116 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा




