हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । WhatsApp : भारतीय रेल्वेकडून प्रवाश्यांसाठी एक नवीन सुविधा सुरु करण्यात आली आहे. आता रेल्वेच्या प्रवाशांना व्हॉट्सऍपवरून ट्रेनचे लाइव्ह स्टेटस आणि पीएनआर पाहता येणार आहेत. मुंबईस्थित स्टार्टअप असलेल्या Railofy कडून हे नवीन फीचर आणण्यात आले आहे. आता या फीचरच्या मदतीने प्रवाशांना WhatsApp वरूनच प्रवासाची सर्व माहिती मिळु शकेल. आता प्रवाशांना ट्रेनचे लाइव्ह स्टेटस आणि पीएनआर तपासण्यासाठी वेगवेगळे ऍप डाउनलोड करावे लागणार नाहीत. हि सुविधा या एका फीचरच्या मदतीने एकाच ऍप द्वारे दिली जाणार आहे.
हे लक्षात घ्या कि, WhatsApp चे हे फीचर चॅटबॉटच्या साहाय्याने चालवले जाते. यामध्ये चॅटिंगद्वारे नंबर टाईप केल्यानंतरच ट्रेन आणि प्रवासासंबंधीची सर्व माहिती प्रवाशांना उपलब्ध केली जाईल. इतकेच नाही तर IRCTC प्रमाणे व्हॉट्सऍप यूझर्सना 139 हा हेल्पलाइन नंबरही देण्यात आला आहे. याच्या मदतीने एक स्टेशनआधीच येणाऱरे स्टेशन आणि इतर तपशील मिळतील.
अशा प्रकारे तपासा ट्रेनचे लाइव्ह स्टेटस…
सर्वात आधी फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये Railofy चा WhatsApp चॅटबॉट नंबर +91-9881193322 सेव्ह करा.
व्हाट्सऍप ऍप्लिकेशन अपडेट करा आणि कॉन्टॅक्ट लिस्ट रिफ्रेश करा.
यानंतर फोनमध्ये सेव्ह केलेल्या Railofy च्या चॅटबॉट नंबरच्या चॅट विंडोवर जा.
आता चॅट बॉक्समध्ये 10 अंकी PNR क्रमांक पाठवा.
Railofy चॅटबॉट आपल्याला रिअल टाइम अलर्ट आणि ट्रेनचे तपशील पाठवण्यास सुरुवात करेल.
रेल्वे प्रवासादरम्यान ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवता येतील
IRCTC कडून रेल्वे प्रवासादरम्यान ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्याची सुविधा देखील दिली जाते. यासाठी प्रवाशांना फोनमध्ये IRCTC चे App असलेले Zoop डाउनलोड करावे लागेल. याच्या मदतीने आपल्याला बसल्या जागेवरच आपले आवडते खाद्यपदार्थ मागवता येतील.
अशा प्रकारे जेवण ऑर्डर करा
Zoop चा WhatsApp चॅटबॉट नंबर +91 7042062070 स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा.
आता व्हॉट्सऍपमध्ये Zoop चॅटबॉट विंडो उघडा.
इथे आपला 10 अंकी PNR क्रमांक टाका आणि जेथून जेवण ऑर्डर करायचे आहे ते येणारे स्टेशन निवडा.
Zoop चॅटबॉटवर आपल्याला रेस्टॉरंटची लिस्ट दिसेल. जेवण ऑर्डर करण्यासाठी यापैकी एक रेस्टॉरंट निवडा आणि फूड बिल ऑनलाइन भरा.
चॅटबॉटवर फूड ऑर्डर ट्रॅकही करता येईल.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.irctc.co.in/
हे पण वाचा :
Share Market पैसे गुंतवत असाल तर टॅक्सशी संबंधित ‘हे’ नियम जाणून घ्या
गेल्या 1 वर्षात ‘या’ Penny Stock ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!!
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, Garib Kalyan Yojana चा कालावधी डिसेंबरपर्यंत वाढवला
Multibagger Stock : घसरत्या बाजारपेठेतही ‘या’ फुटवेअर स्टॉकने गुंतवणूकदारांना दिला भरपूर नफा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, आजची किंमत तपासा