हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील 15 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 एप्रिल ते एक मे पर्यंत कलम 144 लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या काळात अत्यावश्यक कारणाशिवाय लोकांना घराबाहेर पडता येणार नाहीत.
दरम्यान अत्यावश्यक सेवा मात्र अजूनही सुरू असल्याने अत्यावश्यक सेवीतील कर्मचाऱ्यांना आणि वैध कारणासाठी राज्यांतर्गत प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. रिक्षा, एसटी बस, टॅक्सी, रेल्वे, विमान सेवा राज्यात सुरू असून नियामांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
सार्वजनिक वाहतूकीसाठीचे नियम
रिक्षा : चालक+२ प्रवासी
टॅक्सी (चार चाकी) : चालक+आरटीओ नियमानुसार ५० टक्के आसनक्षमता
बस : आरटीओनुसार पूर्ण आसनक्षमता, स्टँडींगला परवानगी नाही
– सर्व प्रवाशांनी मास्क योग्य पद्धतीने लावणे अनिवार्य, अन्यथा पाचशे रुपये दंड
– टॅक्सीत प्रवाशाने मास्क घातला नसल्यास त्याच्यासह चालकाला प्रत्येकी पाचशे रुपये दंड
– प्रत्येक फेरीनंतर वाहनाचे निर्जंतुकीकरण करावे
– नियमांचे पालन न करणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांतील प्रवाशांना प्रत्येकी ५०० रुपये दंड
– बस, रेल्वे, विमानाने येणाऱ्या प्रवाशांना वैध तिकिटाच्या अटीवर पुढील प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीच्या वापराची परवानगी