भाजप नेते आशिष शेलार यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्य लोकांपासून ते दिग्गज लोकं देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. दरम्यान भाजप आमदार आशिष शेलार यांना देखील आता कोरोनाची लागण झाली असून स्वतः शेलार यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली.

मी आज कोविड 19 ची तपासणी केली असता, माझी चाचणी पॉझिटिव्ह आलीय. मी औषधोपचार आणि डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्या सर्वांनी स्वत: ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध असल्याचेही आशिष शेलारांनी सांगितले आहे.

दरम्यान राज्यात कोरोनाने अक्षरशः कहर केला असून याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून कडक निर्बंध लागू करण्यात आले असून 15 एप्रिल ते 1 मे पर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.

You might also like