पोलिसांकडून 6 जण अटकेत; मुंबईत राहणारा दहशतवादी नेमका कोण ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जान मोहम्मद अली शेख, असं अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. महाराष्ट्रातील दहशतवादी विरोधी पथकानं काल जान मोहम्मदच्या घरी जाऊन तपास सुरु केला आहे. तसेच त्याच्यासोबत राहत असलेल्या साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.

जान मोहम्मद अली शेख सायन पश्चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर परिसरात वास्तव्यास होता. सायन येथील तो फार जुना रहिवाशी आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि दोन मुली असे चौघेजण या घरात राहत होते. तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता. जान महोम्मद दहशदवादी कटात सहभागी होता, या बातमीनं त्याच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या सर्वांनाच धक्का बसला आहे.

दरम्यान, जान मोहम्मद शेख हा कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याही संपर्कात होता, अशी माहिती मिळत आहे. सहा संशयितांना पाकिस्तानातून प्रशिक्षण मिळत असल्याची माहिती आहे. देशभर सण-उत्सवांची धामधूम सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवून खळबळ उडवून देण्याची दहशतवादी योजना असल्याचं समोर आलं आहे.

You might also like