ICCने जाहीर केली क्रमवारी ! कोहलीची घसरण तर सिराजचा पहिल्यांदाच अव्वल 100 मध्ये समावेश

Virat Kohli
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या नव्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीची 5 व्या स्थानी घसरण झाली आहे. त्याचवेळी (ICC) शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या कामगिरीमुळे(ICC) त्यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचे नेतृत्व करीत असलेल्या धवनने एका स्थानाने प्रगती करीत 13 वे स्थान मिळवले आहे. तर विंडीजविरुद्ध सलग दोन अर्धशतक झळकावलेल्या श्रेयस अय्यरने 20 स्थानांची मोठी झेप घेत 54 वा क्रमांक मिळवला आहे.

या क्रमवारीत (ICC) गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानी कायम असून, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट अव्वल स्थानी आहे. भारताचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पहिल्यांदाच अव्वल 100 मध्ये प्रवेश करताना 97 वे स्थान मिळवले. अव्वल दहामध्ये बुमराह हा एकमेव भारतीय आहे. त्याच्यानंतर 18 व्या स्थानी युझवेंद्र चहल असून, त्याला 2 स्थानांचा फटका बसला आहे.

या क्रमवारीत (ICC) ऑल राउंडरमध्ये भारताचा हार्दिक पांड्या दहाव्या स्थानी आहे. त्याची दोन स्थानांनी घसरण झाली आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन अव्वल, तर अफगाणिस्तानचा मोहम्मद नाबी दुसऱ्या स्थानी आहे. तर सांघिक (ICC) कामगिरीमध्ये भारत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत न्यूझीलंड 128 पॉईंटसह अव्व्ल तर इंग्लंड 119 पॉईंटसह दुसऱ्या स्थानी आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर