सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातार येथे नुकत्याच झालेल्या 48 व्या कोल्हापूर परिक्षेत्रिय क्रीडा स्पर्धेत सातारा पोलिस दल जलतरण क्रिडा प्रकारात विजेता ठरला. सातारा पोलिस दलाकडून जलतरण स्पर्धेत 9 जणांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये देवानंद बर्गे यांनी 4 सुवर्ण, 3 सिल्वर आणि 2 कास्यपदके मिळवली. त्याच्या यशाबद्दल सातारा पोलिस दलाकडून अभिनदनांचा वर्षाव केला जात आहे.
सातारा जलतरण स्पर्धेतील विजेत्यांची नावे व पदके पुढीलप्रमाणे
1) देवानंद बर्गे – सुवर्ण- 4, सिल्व्हर- 3, कास्य – 2
2) जितेंद्र कुटे – सुवर्ण- 2, सिल्व्हर- 4, कास्य- 2
3) आशिकेष डोळस- 1 सुवर्ण
4) अर्जुन चोरगे- सुवर्ण-1, सिल्व्हर- 1, कास्य- 1
5) समाधान बर्गे- सिल्व्हर- 1
6) विलास गेडाम- कास्य- 1
7) विनायक मानवी- कास्य- 1
8) सागर कदम – सहभाग
9) अमोल पवार – सहभाग
साताऱ्यात 12 ते 17 या कालावधीत पोलीस कवायत मैदानावर स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत 1200 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी घेतला होता. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच सातारा जिल्हा पोलीस दलाच्या जिल्हा क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यानंतर लगेच रेंजची स्पर्धाही साताऱ्यात झाल्या. या स्पर्धेसाठी पुणे ग्रामीण, सोलापूर शहर आणि ग्रामीण, सातारा कोल्हापूर आणि सांगली पोलीस दलातील पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. प्रत्येक जिल्ह्याचे सरासरी 200 स्पर्धक असून वैयक्तिक आणि सांघिक विविध स्पर्धात सहभागी होते.