राधानगरी – भोगावती मार्गावर भीषण अपघात, CCTV फुटेज आले समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये बाईक आणि जीप यांच्यात भीषण अपघात (Accident) झाला आहे. कोल्हापुरातील राधानगरी-भोगावती मार्गावर हा भीषण अपघात (Accident) झाला आहे. हि अपघाताची घटना महामार्गावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या अपघाताचा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल.या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, राधानगर-भोगावती मार्गावरुन दोन बाईक एका शेजारी-शेजारुन जात आहेत.

त्याच दरम्यान समोरुन एक भरधाव बोलेरो गाडी येते आणि ती एका बाईकला जोरदार धडक देते. हि धडक एवढी भीषण आहे कि, दुचाकी थेट 15 फूट दूर जाऊन पडते. सुदैवाने या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. या अपघाताची (Accident) माहिती मिळताच त्या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला आहे.

औरंगाबाद – जालना महामार्गावर देखील असाच भीषण अपघात झाला होता. यामध्ये एसटी बस आणि बोलेरो पिकअप गाडीची धडक होऊन हा भीषण अपघात घडला आहे. या भीषण अपघातात 7 जण जागीच ठार झाले आहेत. हासुद्धा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.

हे पण वाचा :

आईच्या मृत्यूनंतर विरह सहन न झाल्याने 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

शरद पवार यांना धमकीचे ट्विट

KKR चा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे उर्वरित IPL मधून बाहेर

NIA ची मोठी कारवाई : डी गँगच्या दोघा जणांना अटक

एक दिवस औरंगजेबाच्या भक्तांना त्याच कबरीत जावे लागेल…, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल

Leave a Comment