मरकजहून परतलेला शाहूवाडीतील तरुण कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

दिल्लीतील मरकजहून जिल्ह्यात परतलेल्या शाहूवाडी तालुक्यातील ३० वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आज आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक बी सी केम्पी-पाटील यांनी दिली.हा तरुण दिल्ली येथून १४ मार्च रोजी निघाला होता तर १६ मार्चला कोल्हापुरात पोहोचला होता. दरम्यान, येथील धार्मिक स्थळामध्ये एक दिवस राहून तो मलकापूरला खासगी वाहनातून गेला. मलकापूरमधील धार्मिक स्थळातही तो एक दिवस राहिला. यानंतर तो आपल्या घरी दि १८ मार्चला घरी परतला.

पन्हाळा येथील संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ५ एप्रिलला प्रशासनामार्फत दाखल करण्यात आले होते. मरकजहून परतलेल्या अन्य प्रवाशांसोबतच याचा घेण्यात आला होता. त्यात त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. त्याला  आज सीपीआरमधील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या तरुणाला कोल्हापुरातून मलकापूरला घेवून जाणाऱ्या त्याच्या संपर्कातील अन्य चौघांची तपासणीही करण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”