कोल्हापुरात दोन गटांत झालेल्या हाणामारीत झालेल्या खूनप्रकरणी एकाला जन्मठेप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर- आरळे (ता. करवीर) येथील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पांडूरंग रामचंद्र देसाई (वय ५५) यांचा राजकीय वैमनस्यातून झालेल्या वादातून गोळीबार करून खून केल्याप्रकरणी आरोपी सुरेश भाऊसाहेब पाटील (वय ४३, रा. आरळे, ता. करवीर ) याला दोषी ठरवत कोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. विठलानी यांच्या कोर्टासमोर सुनावणी झाली.

आरळे (ता. करवीर) येथे २००८ साली सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाल्याचा राग भरत भाऊसाहेब पाटील आणि त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांच्यात होता. या कारणावरुन तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हिंदुराव विष्णू पाटील आणि भारत पाटील या दोन राजकीय गटामध्ये वैमनस्य निर्माण झाले होते. या कारणातून २१ फेब्रुवारी २००८ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हिंदुराव पाटील यांच्या संस्थेच्या शाळेच्या पटांगणात भरत पाटील व त्यांच्या गटाचे कार्यकर्ते काठ्या कुऱ्हाडी व तलावर आदी शस्त्रे घेवून आले. त्यांनी हिंदुराव पाटील गटातील कार्यकर्त्यांवर आणि संस्थेचे उपाध्यक्ष पांडूरंग देसाई यांच्यावर हल्ला केला होता.

दरम्यान सुरेश पाटील यांनी बंदुकीने पांडूरंग देसाई यांच्यावर गोळीबार केल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी भरत पाटील यांच्यासह पांडूरंग दिनकर पाटील, बाजीराव निवृत्ती पाटील, तानाजी मारूती पाटील, नामदेव निवृत्ती पाटील (सर्व रा. आरळे ) यांच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्हाचा तपास करवीरचे तत्कालीन पोलिस निरीक्षक धनंजय भांगे यांनी केला होता. त्याची सुनावणी गुरुवारी झाली. सरकार पक्षातर्फे १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी अन्य चार व वैद्यकीय अधिकारी,तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्वाच्या ठरली. त्यासह न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा बॅलेस्टीक अहवाल आणि सबळ पुराव्याच्या आधारे आरोपी सुरेश पाटील याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यासह पाच हजार रूपये दंड , दंड न भरल्यास सहा महिन्याचा तुरूंगवास अशी शिक्षा सुनावली. अन्य आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

कोल्हापूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या स्थापनेपासून १६ हजार पैकी १५ हजार प्रकरण निकाली

शाहू महाराज हायस्कुलमध्ये माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न; जुन्या आठवणींना उजाळा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३ दिवसीय महाबळेश्वर दौऱ्यावर; कुटुंबासाठी घेतली ३ दिवसांची सुट्टी