कोल्हापूर मोक्का न्यायालयातून आरोपीने ठोकली धूम..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
मोक्का गुन्ह्याखाली अटकेत असलेला आरोपी श्रीधर अर्जून शिंगटे (रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज) हा आज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातून पळून गेला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शिंगटे याच्याविरूद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी कोल्हापूरातील राजारामपूरी, जुना राजवाडा, गडहिंग्लज आणि आजरा पोलिस ठाण्यात त्याच्याविरूद्ध विविध गुन्हे दाखल झाले आहेत.

26 फेब्रुवारी 2019 रोजी उद्योजक रमेश रेडेकर यांना एक कोटीच्या खंडणीसाठी शिंगटे याने धमकी दिली होती. याप्रकरणी रेडेकर यांनी 27 फेब्रुवारीला त्याच्याविरूद्ध गडहिंग्लज पोलिसांत फिर्याद दिली होती. यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती आज गडहिंग्लज इथल्या न्यायालयात त्याची सुनावणी असल्याने त्याला आणलं होतं यावेळी नाष्टा करण्याच्या बहाण्यानं न्यायालय आवारातील कँटीन मधून त्याने पोलिसांची दिशाभूल करत धूम ठोकली. त्याच्या तपासासाठी पोलिसांनी पथक रवाना केले असून सिंधुदुर्ग परिसरातही त्याचा शोध घेतला जात आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment