कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आज प्लॅस्टिकचा वापर करणा-या एका व्यापाऱ्यांकडून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्लॅस्टिक व थर्माकोल इत्यादीपासून तयार केलेले वस्तूंचा वापर करण्यावर बंदी घातली आहे. त्यानुसार प्लॅस्टिकचे वितरण, साठवणूक घाऊक, किरकोळ विक्री तसेच उत्पादन करणारे नागरिक व व्यावसायिक यांच्यावर महापालिकेच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
याअंतर्गत आज लक्ष्मीपूरी परिसरातीला मनिष ट्रेडर्स यांच्यावर प्लास्टिक विरोधी पथकाने दुसऱ्यांदा कारवाई करुन एकूण रु. 10,000/- रुपये दंड वसूल केला. तसेच उघडयावर कचरा टाकणाऱ्या दोन नागरीकांना 1,150/- रुपये दंड करण्यात आला.
सदरची कारवाई आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक राजेंद्र पाटील, शिवाजी शिंदे, सौरभ घावरी, गिता लखन, मुकादम व कर्मचारी यांनी केली.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.