कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये ८ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा त्र्येचाळीसावा रविवार असून या अभियानामध्ये शहरातील जेष्ठ नागरीक, स्वरा फाउंडेशन कार्यकर्ते, स्वच्छता दुत अमित देशपांडे, विवेकानंद कॉलेजचे एन.एस.एसचे विद्यार्थी, वृक्षप्रेमी स्वंयसेवी संस्था व महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. सदरची मोहिम आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडली. पंप हौस येथे संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आजच्या स्वच्छता मोहिमेची सुरवात करण्यात आली. यावेळी याठिकाणी स्वरा फौंडेशनच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी गांधी मैदान, पंचगंगा नदी घाट, रियालन्स मॉल संपुर्ण परिसर, दसरा चौक ते खानविलकर पेट्रोलपंप व माळकर तिकटी ते छत्रपती शिवाजी मार्केट, हुतात्मा पार्क, टेंबलाईवाडी उड्डान ते लोणार वसाहत मेनरोड तसेच कळंबा तलाव या परीसराचीही स्वच्छता या मोहिमेत करण्यात आली. या मोहिमेत 4 जेसीबी, 6 डंपर, 6 आरसी गाडया व महापालिकेच्या 120 स्वच्छता कर्मचा-यांच्या सहाय्याने ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशनच्या वतीने सावित्रीबाई फूले हॉस्पीटल येथे बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या जयंती निमित्त हॉस्पीटल परिसरात वृक्षारोपन करुन सावित्रीबाई फूले हॉस्पीटलची स्वच्छता करण्यात आली.
यावेळी आरोग्यधिकारी डॉ.दिलीप पाटील, शाखा अभियंता आर.के.पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पोवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, कळंबा ग्रामपंचायचे सरपंच सागर भोगम, पाचगाव सरपंच संग्राम पाटील, क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, दिलीप देसाई, गोखले कॉलेज प्राध्यापक सौ. स्मिता गिरी, विवेकानंद कॉलेज एन.एस.एसचे विद्यार्थी, विभागीय आरोग्य निरीक्षक राहूल राजगोळकर, सर्व आरोग्य निरिक्षक, कर्मचारी व नागरिक यांनी सहभाग नोंदविला.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.