Kolhapur Mumbai Flight : कोल्हापूर- मुंबई विमानात 12 सीट्स “बिझनेस क्लास” साठी राखीव

Kolhapur Mumbai Flight
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोल्हापूर वरून मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यापूर्वी कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा ही आठवड्यातून फक्त ३ दिवस सुरु होती. परंतु आता वाढती मागणी पाहता १५ ऑक्टोबरपासून मुंबई- कोल्हापूर – बंगळुरू अशी विमानसेवा (Kolhapur Mumbai Flight) ररोज सुरु होणार असून या विमानातील १२ जागा बिझनेस क्लास’साठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हाय लेव्हलच्या प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी म्हणता येईल.

12 सीट्स “बिझनेस क्लास” साठी राखीव- Kolhapur Mumbai Flight

कोल्हापूरवरून मुंबईला मोठ्या प्रमाणात मोठे व्यावसायिक, कलाकार, आमदार आणि खासदार यांचे येणे – जाणे असते. इतके दिवस फक्त साधारण बैठक  व्यवस्था उपलब्ध असल्याने अनेकजण अन्य पर्यायचा वापर करत होते. मात्र आता त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. मुंबई- कोल्हापूर – बंगळुरू विमानसेवेत 76 सीटची आसन व्यवस्था उपलब्ध असणार आहे. त्यातील 12 सीट्स या आता “बिझनेस क्लास” साठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोजच्या विमान सुविधेबरोबरच जलद व आरामदायी प्रवास देखील कोल्हापूरकरांना करणे शक्य  होणार आहे.

60% सीट्स बुक –

विमान कंपनीने दिलेल्या माहितीनुसार रविवारपासून सुरु होणाऱ्या विमानसुविधेसाठी सुटणाऱ्या पहिल्या विमानातील 60% सीट्स बुक करण्यात आलेले आहेत. उर्वरित सीट्स देखील शनिवारपर्यंत बुक होतील असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. कोल्हापूरवरून शासकीय व खासगी कामासाठी मुंबईला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रेल्वेचा व अन्य पर्यायाने प्रवासासाठी अधिक  वेळ लागतो. त्यामुळे कोल्हापूरवरून  मुंबई रोज जाणारी विमानसेवा उपलब्ध व्हावी यासाठी  मागणी होत होती. याआधी आठवड्यातून फक्त तीन दिवस ही सुविधा उपलब्ध होती. परंतु स्टार एअरलाईनने नवीन विमान सुरु करण्याच्या केलेल्या घोषणेमुळे कोल्हापूरवरून मुंबई आणि बेंगलोर येथे जाण्यासाठी दररोज विमान (Kolhapur Mumbai Flight) उपलब्ध असणार आहे.

कसं असेल विमानाचे वेळापत्रक?

सकाळी ९.०५ वाजता- बंगळूरहून कोल्हापुरात दाखल
१०.५० वाजता- कोल्हापूरहून मुंबईसाठी उड्डाण
११.५० वाजता- विमान मुंबईत उतरणार
३.४० वाजता- मुंबईतून कोल्हापूरसाठी उड्डाण
४.४० वाजता- विमान कोल्हापुरात उतरणार