कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील उचत आणखी एकाला कोरोना झाल्याचे बुधवारी स्पष्ट झालं होतं मात्र यामुळं संबंधित रुग्णावर उपचार करणारा सीपीआरमधील स्टाफही कोरोना संशयितांच्या यादीत आला आहे. 18 ब्रदर आणि नर्सेस सह दोन कर्मचाऱ्यांवर पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. या 20 जणांचे स्वॅब आज सकाळी घेण्यात आले असून ते तपासणीसाठी लॅब ला पाठवण्यात आले आहे.ब्रदर आणि नर्स यांनी पीपीई किट न वापरता रुग्णावर उपचार केले असल्याने जास्त धोका असल्याचे सांगण्यात येते. रिपोर्टनंतरच त्यांच्यावरील पुढील उपचाराची दिशा ठरेल.
उचतमधील एकाला कोरोना झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या इतरांनाही उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. त्यात संबंधित कोरोनाग्रस्ताच्या नातवाईकांचा समावेश आहे. पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णांवर 11 एप्रिलपासून सीपीआरमध्ये उपचार सुरू होते. दुधगंगा इमारतीतील पाचव्या मजल्यावरील पुरूष वैद्यकीय कक्षात त्याच्यावर उपचार सुरू होते. आजअखेर सीपीआरमधील 18 जणांचा त्यांच्याशी सेवा करताना थेट संपर्क आला आहे. यात एक परिसेविका (इनचार्ज), 8 ब्रदर, 9 नर्सेस आणि 2 कर्मचारी यांचा समावेश आहे.
संबंधित रूग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या रूग्णावर उपचार करणार्या सर्व ब्रदर, नर्सेस यांना तत्काळ सीपीआरमधील डोळ्यांच्या वॉर्डमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. सकाळी त्यांचे स्वॅब घेण्यात आले. त्यांच्यावर कोरोना संशयित म्हणून उपचारही सुरू करण्यात आले आहेत. सीपीआरमधील या २० जणांचा कोरोना संशयितांच्या यादीत समावेश झाल्याने सीपीआर हॉस्पिटलमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”