कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन करण्यात आला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मात्र कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विनाकारण, हुल्लडबाज पणे रस्त्यांवरून फिरणारेही आहेत. अशा वाहन धारकांवर कोल्हापूर पोलिसांनी कारवाई करत आज अखेर सुमारे २ हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत.
कोल्हापूरातल्या शहर वाहतूक शाखेच्या आवार हाऊस फुल्ल झाल्याने पोलीस मुख्यालयातील मैदानावरही सर्व ही वाहने ठेवण्यात आली आहेत. यात चारचाकी, रिक्षा, दुचाकी, सायकली यांचा समावेश आहे. आज अखेर जिल्ह्यातील सुमारे २ हजार वाहने जप्त करण्यात आली असून आता पोलीस मुख्यालयातील मैदान देखील गच्च भरलं आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर या वाहनांचा ताबा दंडात्मक कारवाई करून वाहन मालकास देण्यात येईल अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलीय.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”