कोल्हापूरात खासगी सावकारांच्या घरी छापे; १२ आधिकारी ६३ कर्मचाऱ्यांचा सहभाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
जिल्हा उपनिबंधक सहकार आणि पोलीस विभागाचे १२ अधिकारी आणि ६३ कर्मचाऱ्यांच्या पथकाने अवैध सावकारीवर सात ठिकाणी आज छापे घातले. खरेदी खत, कच्च्या नोंदीच्या वह्या, डायऱ्या, कोरे व लिखित धनादेश, संचकार पत्रे, कोरे व हस्तलिखित बाँड अशी महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली.

जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली, राजेंद्र विष्णू जगदाळे, मंगल राजेंद्र जगदाळे(रा वडणगे, ता. करवीर), शहाजी पाटील (रा केर्ले, ता. करवीर), विनायक सदाशिव लाड (रा. सातार्डे, ता. पन्हाळा), बजरंग बळी पाटील, राजाराम बळी पाटील, सज्जन बळी पाटील, तुकाराम बळी पाटील, भूषण बळी पाटील व मंगेश जयसिंग पाटील (रा. कोतोली ता. पन्हाळा) यांच्या विरुद्ध अवैध सावकारीची तक्रार प्राप्त झाली होती.

सहायक निबंधक प्रदीप मालगावे, अमित गराडे, प्रेमदास राठोड, बाळासाहेब पाटील, चंद्रकांत इंगवले, शिरीष तळकेरी,अनिता शिंदे, ए पी खामकर, ए एम चोपडे या सहकार विभागाच्या पथकाने आणि दोन पोलीस आधिकारी, ४२ कर्मचारी आणि २१ पोलीस यांनी आज राहत्या घरात झडती घेतली.

यात जमिनीशी संबंधित कागदपत्रे, दस्त अशी महत्वाची कागदपत्रे हस्तगत केली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली असून अधिक चौकशी सुरु आहे. अवैध सावकारीच्या माध्यमातून आर्थिक पिळवणूक, स्थावर मालमत्ता शेत, जमीन बळकावली असल्यास अशांविरुध्द नागरिकांनी तक्रारी कराव्यात, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक शिंदे यांनी केले आहे.

 

Leave a Comment