चोरट्यांचा धुमाकूळ : १ लाखाचा ऐवज लंपास

0
35
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी 

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.आता कोल्हापुरातल्या कळंबा रिंगरोडवरील प्रथमेश नगरातील पोलिसाच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीला आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा उचकटून सोन्याचे दागिने आणि रोख रक्‍कम असा सुमारे १ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कळंबा रिंगरोडवरील प्रथमेश नगरातील घरात पहिल्या मजल्यावर चौगले कुटुंबीय झोपलेले असताना चोरट्याने तळमजल्यात प्रवेश करुन धाडसी चोरी केली. याबाबत दिनकर शंकर चौगले यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दाखल केली. फिर्यादी चौगले यांचा मुलगा दिग्विजय पोलिस खात्यात आहे. कळंबा रिंगरोडवर त्यांचे दोन मजली घर आहे. मुलगा दिग्विजय पोलिस तपासकामी बाहेर गावी गेल्याने दिनकर चौगले आणि त्यांच्या पत्नी दोघेच घरी होते.
रात्री साडे बाराच्या सुमारास तळ मजल्यावरील दरवाजाला कुलूप लावून दोघेही वरच्या मजल्यावर गेले. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे टॉप्स, बिल्वर पाटल्या, चांदीचे ताट, वाटी, चमचे, पैंजण आणि रोख १० हजार चोरुन नेले आहेत. अधिक तपास करवीर पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here