कोल्हापूरकरांनो, आम्हाला निर्बंध कडक करायची हौस नाही, थोडं सोसा, अजित पवारांनी दरडावलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोल्हापुरात कोरोनाचा अधिक प्रसार होत असल्याने सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरास भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी कोल्हापूरकरांवर चांगलेच दरडावले. यावेळी पवार म्हणाले “कोल्हापुरात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता कोल्हापुरात कोणत्याही परिस्थितीत निर्बंध कमी केले जाणार नाहीत. त्यामुळे कोल्हापूरकरांनो आम्हाला निर्बंध अधिक कडक करायची हौस नाही, थोडं सोसा.”

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी कोल्हापुरास भेट देत तेथील वाढत्या रुग्णसंख्येची माहिती घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बैठक घेत जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावाही घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “महाराष्ट्रात सर्वाधिक स्वरूपात कोल्हापुरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. येथील कोरोना रुग्णांचे प्रमाण अधिक वाढत आहे. या ठिकाणची परिस्थिती पाहता निर्बंध कमी करण्याचा अजिबात विचार नाही, उलट ते अधिक कडक करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

यावेळी पवार म्हणाले, कोल्हापुरात वाढती रुग्णसंख्या पाहता या ठिकाणी प्रशासनाकडून सर्व उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र, कोल्हापुरातील नागरिकांकडून कोरोनाच्या उपायांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या ठिकाणचे लोक तोंडाला मास्क लावत नाहित. कोणत्याही स्र्रूपाच्या आरोग्याच्या सुविधा घेत नाहीत. विनाकारण रस्त्यावर येतात. त्यामुळे कोरोनाचा अधिक प्रसार होतोय. आम्ही कोरोनाचा संसर्ग अधिकाधिक का वाढतोय? त्यामागची नेमकी करणे कोणती आहेत? याचा शोध घेत आहोत.

You might also like