कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरण: संशयित आरोपींनी हत्यार मुंबईच्या खाडीत टाकली; पोलीस तपासात माहिती उघड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हस्तेला पाच वर्षे झाली तरी अद्याप खरे मारेकरी सापडत नसल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून कोल्हापूरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याचाच भाग म्हणून सकाळी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं. तसेच त्यानंतर आंदोलकांनी पोलिसांची भेट घेऊन पानसरे हत्या प्रकरणातील खऱ्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली.

यावेळी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी दीर्घकाळ सुरू असणाऱ्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करत नव्या सरकारने गंभीरपणे तपास करण्याची मागणी केली. तसेच पानसरे हत्या प्रकरणातील शस्त्रे मुंबईच्या खाडीत आरोपींनी फेकल्याचे तपासात उघड झाल्याचे सांगत अमेरिकन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शस्त्रांचा शोध सुरू असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment