कोकणवासियांसाठी खुशखबर! गणेशोत्सवासाठी स्पेशल रेल्वे गाड्यांची अधिकृत घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली. कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची अधिकृत घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रक १५ ते ५ सप्टेंबर दरम्यानस १६२ गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी माहिती दिली.

कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची घोषणा आज करण्यात आली आहे. १५ ऑगस्टला पहिली गाडी सुटणार आहे. ती १६ ऑगस्टला कोकणात दाखल होईल. १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत सुटणाऱ्या १६२ गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. ८१ अप तर ८१ डाऊन अशा गाड्या धावणार आहेत. रत्नागिरी आणि सावंतवाडी दरम्यान, या गाड्या धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला टर्मिनस येथून या गाड्या सुटणार आहे. बुकिंग १५ पासून सुरु होणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांना प्रवास करताना कोरोनाशी संबंधित सर्व नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”