सहकार क्षेत्रात खळबळ : कोरेगावचा जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना अवसायनात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राज्यात सध्या चर्चेत असलेला कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाला आहे. राज्याचे साखर संचालक यांनी साखर कारखान्याच्या अवसायकपदी कोरेगाव तालुक्याच्या दुय्यम सहकारी उपनिबंधक प्रिती कि. काळे यांची शासनाने नियुक्ती केली आहे. यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने, इतर अनेक बँकांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी लिलावात काढला. गुरु कमोडिटी प्रा. लि. या खाजगी कंपनीने लिलावात तो साखर कारखाना 65 कोटी 75 लाख रुपयांना 2010 साली विकत घेतला. साखर कारखान्याच्या तत्कालीन चेअरमन माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी लगेचच सन 2011 सालापासून विविध कोर्टात जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना विक्री विरोधात अनेक दावे दाखल करुन राज्य सरकारच्या आणि राज्य सहकारी बँकेच्या विरोधात आवाज उठवला.

जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना विक्री व्यवहार रद्द व्हावा आणि साखर कारखाना पुन्हा शेतकरी सभासदांच्या मालकीचा करावा. यासाठी गेली 10 वर्षे शालिनीताई पाटील यांचा विविध कोर्टात न्यायालयीन संघर्ष सुरू होता, असे असताना जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखान्यावर अचानक अवसायक नेमून शासनाने शालिनीताई पाटील यांना मोठा धक्का दिला.

Leave a Comment