Kotak Mahindra Bank ने FD वरील व्याजदरात पुन्हा केली वाढ, नवीन व्याज दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Kotak Mahindra Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता Kotak Mahindra Bank ने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.

As Kotak Mahindra Bank reports results, here are top five takeaways

01 नोव्हेंबर 2022 पासून नवीन दर लागू

Kotak Mahindra Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 01 नोव्हेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. या बदलानंतर आता बँकेकडून 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीच्या FD वर सर्वसामान्यांना 2.75% ते 6.20% तर ज्येष्ठ सर्वसामान्यांना 3.25% ते 6.70% व्याजदर दिला जाईल. तसेच 23 महिने ते 3 वर्षाच्या FD वर आता सर्वसामान्यांना 6.30% तर ज्येष्ठ नागरिकांना 6.80% व्याजदर मिळेल.

Kotak Mahindra Bank posts 15% rise in Q3 net profit to Rs 2,131 crore | The Financial Express

नवीन व्याज दर

आता Kotak Mahindra Bank कडून 7-14 दिवसांच्या FD वर 2.75 टक्के आणि 15-30 दिवसांच्या FD वर 3.00 टक्के व्याज मिळेल. तसेच 31 ते 45 दिवसांच्या FD वर 3.25 टक्के आणि 46-90 दिवसांच्या FD वर 3.50 टक्के व्याजदर मिळेल

त्याच बरोबर कोटक महिंद्रा बँकेने 91-120 दिवसांच्या FD वरील व्याज 3.75% वरून 4.00% केले आहे आणि आता 121 – 179 दिवसांच्या FD वरील व्याज 25 bps ने वाढून 4.25% झाले आहे. यानंतर आता 180 दिवस ते 270 दिवसांच्या FD वर 5.50%, 271 दिवसांच्या FD वर 5.75%, 364 दिवसांच्या FD वर 6.00% आणि 365 दिवसांपासून ते 389 दिवसांच्या FD वर आता 6.10% व्याजदर मिळेल.

Kotak Mahindra Bank ने 390 दिवसांच्या (12 महिने 25 दिवस) FD वरील व्याजदर 6.10% वरून 6.25% पर्यंत वाढवला आहे. तसेच 23 महिने ते 3 वर्षांच्या FD वर, बँकेने 6.20% वरून 6.30% पर्यंत व्याजदर वाढवला आहे. कोटक महिंद्रा बँकेने 3 वर्ष आणि त्याहून जास्त मात्र 4 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 6.25% व्याजदर ऑफर केला आहे. तसेच 4 वर्षे आणि त्याहून जास्त आणि 10 वर्षांच्या एकत्रित मुदतीच्या FD वर आता 6.20% व्याजदर मिळेल.

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. Kotak Mahindra Bank

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.kotak.com/en/personal-banking/deposits/fixed-deposit.html

हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा