कोयनानगर | कोयना आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून गेल्या २४ तासात ३७१७ मिली मिटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कोयना धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली असून एकुण पाणीसाठा ९०.८३ टी.एम.सी. झाला आहे. त्याचबरोबर माण आणि खटाव या तालुक्यांसाठी भाग्यरेशा ठरलेल्या उरमोडी धरणातील पाणीसाठ्यातही वाढ झाली असून पाणीसाठा ८६.८१ टी.एम.सी. झाला आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी कोयना भागात मागील काही तासांत जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे जावळी खोर्यातील जनजीवण विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील कन्हेर, तारळी, चांदोली, धाम बलवडी इत्यादी धरणांतील पाणीसाठ्यातही चांगलीच वाढ झाली आहे.