धक्कादायक : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने स्वतः ला पेटविले

0
88
Women Fire
Women Fire
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण | कोयनानगर भागातील ढाकलण येथे पतीकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळलेल्या एका विवाहितेने स्वतः ला पेटवून घेतले. पल्लवी सचिन कदम (वय – 26) असे या दुर्घटनेत मृत्यु पावलेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सचिन कदम याला कोयना पोलिसांनी अटक केली आहे.

कोयना पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पल्लवी कदम या राहत्या घरी रॉकेल भरत असताना दिव्याने पेट घेतले असताना पेटून गंभीर जखमी झाल्याची तक्रार (दि. 6 मार्च) पोलिसांत दिली होती. या प्रकरणी कोयना पोलिसांनी गुन्हा नोंद करून कसून चौकशी केली.

विवाहितेच्या पतीनेच पल्लवी हिच्या अंगावर रॉकेल ओतले. तुला जगण्याचा काही अधिकार नसल्याचे बोलून तिला तिच्या दोन लहान मुलींसमोर मारहाण केली. पतीच्या त्रासाला कंटाळून पल्लवी यांनी स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली असल्याचे तिच्या 10 वर्षांच्या मुलीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पती सचिन कदम याला अटक करण्यात आली. नवनाथ गायकवाड तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here