Tuesday, June 6, 2023

क्रांतीचौकातील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा जानेवारीत बसवणार

औरंगाबाद : क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा डिसेंबर २०२१ किंवा जानेवारी २०२२ पर्यंत बनविण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली आहे.

क्रांती चौक येथील जुना पुतळा दोन वर्षांपूर्वी महापालिकेने काढला होता, त्यानंतर महापालिकेने चबुतरा बांधण्याचे काम हाती घेतले होते. परंतु बांधकामसाठी निधी वेळेवर मिळत नसल्याने कंत्राटीदराकडून काही काळ काम बंद करण्यात आले होते. दरम्यान, चबुतऱ्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती एकवीस फूट उंच व बावीस फूट लांब आणि सहा टन वजनाचा पुतळा पुण्यात तयार होत आहे.

चित्रकल्पक आर्ट स्टुडिओचे दीपक थोपटे व त्यांच्या सहकार्याने बनवलेल्या या पुतळ्याची पाहणी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सह लोकप्रतिनिधी महापालिका अधिकाऱ्यांनी केली होती. पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर क्रांती चौकातील पुतळा बसवण्यात येणार, असून स्मार्ट सिटी अभियानातून क्रांती चौकात सुशोभीकरण केले जाणार असल्याचे आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले.