मुंबई प्रतिनिधी | कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना राबवता येणे अशक्य गोष्ट आहे. तसेच कृष्णा कोयना नद्यांचे पाणी दुष्काळी भागाला पुरवण्याचे स्वप्न आता भंग पावणार असल्याचे चित्र सध्या राज्य सरकारच्या भूमिकेवरून दिसून येत आहे. सोलापूर , उस्मानाबाद , बीड, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याला पाणी देण्याची योजना आता अपूर्णच राहणार असल्याचे चित्र सध्या दिसते आहे.
विधानसभा निवडणूक २०१९ : महाराष्ट्रातील ‘या’ मतदारसंघात होणार चुलत्या पुतण्याची लढाई
आमदार अतुल भातखळकर यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाचे उत्तर देताना गिरीश महाजन या योजनेबद्दल बोलत होते. हरित लवादाने कृष्णा नदीच्या पाणी वाटप तंट्यावर दिलेल्या निर्णयानुसार कृष्णानदीच्या पाण्याच्या संदर्भात असलेल्या कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला राबवता येणार नाही असे गिरीश महाजन म्हणाले आहेत.
खुशखबर ! आता कोणत्याही रेशन दुकानातून रेशन खरेदी करता येणार
कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या मुद्दयांवर भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची भाजपच्या या भूमिकेमुळे चांगलीच गोची झाली आहे. रणजितसिंह मोहिते पाटील , रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देखील याच मुद्द्यावर भाजपमध्ये प्रवेश केला होता. शरद पवारांनी नेहमी कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या मुद्द्याला विरोध केला आहे असा आरोप सुद्धा नेहमीच दोन्ही रणजितसिंहांनी केला आहे. तर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, गिरीश महाजन यांच्यातच कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य आहे असे वक्तव्य रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेशाच्या वेळी दिले होते. त्यामुळे आता त्यांची सरकारच्या या भूमिकेमुळे चांगलीच गोची झाली आहे.
पाण्याप्रमाणे पाकिस्तान सेमी फायनलसाठी देखील भारतावरच अवलंबून