कृष्णा कारखाना निवडणूक : मनोमिलनाबाबत आशावादी म्हणत अविनाश मोहितेंवर इंद्रजित मोहितेंचे टीकास्त्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

लोकाभिमुख, लोकांसाठी असा कारखाना निर्माण करू इच्छित आहोत. आताच्या आणि मागच्या दोन्ही गटाच्यामध्ये त्यांची उणीव होती. तरी आम्ही सर्वांना एकत्रित करून आणून सर्वांच्या प्रयत्नानी एकसंध राहण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु तो प्रयत्न अद्यापतरी पूर्णत्वास नेता आलेला नाही. तोपर्यंत अर्ज भरण्याचा अवधी संपेल म्हणून सर्व 21 जागेवर त्याच्या डमीसह अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आज आम्ही 17 उमेदवारांचे अर्ज दाखल केले असले तरी मनोमिलनाचा विषय बाजूला ठेवला नसल्याचे कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन इंद्रजित मोहिते यांनी सांगितले.

संस्थापक पॅनेल आणि यशवंतराव मोहिते रयत पॅनेल एकत्रित येण्यासाठी आम्ही अजूनही आशावादी आहोत. तुझं- माझं न करता कारखान्यांचे हित बघणारे लोक एकत्रित आणत आहोत. एकमेकांच्या विरोधात लढले एकत्र येण्यास बराच वेळ जाणार आहे. आज अर्ज भरला म्हणजे मनोमिलनाचा विषय बाजूला ठेवला असे नाही. ती चर्चा चालू राहिल आम्ही सकारत्मक आहोत. परंतु शेवट काय निष्पन्न होईल यांची खात्री मी घेवू शकत नसल्याचे म्हणत अविनाश मोहिते यांना टोला लगावला आहे.

कृष्णा कारखाना निवडणुक : माजी चेअरमन इंद्रजीत मोहिते यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मनोमिलनासाठी बैठक, चर्चा सुरू : इंद्रजित मोहिते

आमचे मार्गदर्शक, कार्यकर्ते यांना विश्वासात घेवून अविनाश मोहिते यांच्यासोबत मनोमिलनाच्या बैठका सुरू आहेत. आम्ही मनोमिलनाबाबत आशावादी आहोत. मात्र टाळी एका हातांनी वाजत नाही तर त्यासाठी दोन्ही हातांची गरज असते असे म्हणाले. सध्या दोन्ही पॅनेलकडून अर्ज भरले असल्याने अंतिम निर्णय हा 3 जूनला अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीच समजू शकणार आहे. तेव्हा गुरूवारी 3 जूनलाच कृष्णा कारखान्यात दुरंगी कि तिरंगी निवडणूक होणार हे समजणार आहे.

Leave a Comment